देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. काही जीवनावश्यक गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं काही बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे देशात २१ दिवसासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता १४ एप्रिलला लॉकडाऊनला २१ दिवस पूर्ण होणार आहेत.