नाशिक मध्ये दिवसेंदिवस कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी या संकटाला तोंड देत असतांना रुग्णावर होणारा खर्च सगळेच भरू शकतात असे नाही, आता हा खर्च कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेची जनजागृती करत आहे. या योजने अंतर्गत कमी खर्चात तुमचा कोरोनाचा ईलाज होऊ शकतो.