लहानपणी छोट्या-छोट्या चुंबकासोबत खेळायला छान मजा यायची. लहान मुलांना तर हा चमत्कारच वाटायचा. निरूपयोगी स्पीकर्स मधून, मोटारी मधून काढलेले हे चुंबक लोखंडी वस्तूंना चिकटतात. त्यामुळे चुंबकांशी खेळण्याची काही वेगळीच गंमत होती. मध्यंतरी बाजारात खेळण्याचे चुंबक सुद्धा उपलब्ध व्हायला लागले होते.