एक वेळ होती जेव्हा लोक सातच्या सुमारास जेवण करून नऊ वाजता सहज झोपी जायचे. दिवसभर केलेल्या कामानंतर सहज झोपेच्या मिठीत हरवून जायचे. अकरा वाजेपर्यंत चिटपाखरू देखील शोधून सापडायचं नाही. जसजशी तंत्रज्ञानात प्रगती होत गेली, आयुष्यातील श्रम कमी होऊ लागले. वेळही भरपूर मिळू लागला पण झोप मात्र पार