एक वेळ होती जेव्हा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर शक्तीमान अधिराज्य करायचं. मात्र अचानक शक्तीमान मालिका बंद झाली आणि त्या काळातील चिमुकल्यांचा जणू टीव्हीवरचा विरंगुळाच हरवून गेला. पण मालिका नक्की बंद का झाली याचं कारण तब्बल १४ वर्षांनंतर, म्हणजेच आता काही दिवसांपूर्वी समोर आलं.