आजकालच्या धावपळीच्या जगात तरुणांना शेकडो गोष्टी मॅनेज करायच्या असतात. त्यातल्या त्यात सर्वात मोठं चॅलेंज असतं ते लग्न झालेल्या स्त्रिया, अथवा घरातील कर्त्या महिलांसमोर; ज्या घर सांभाळून नोकरीधंदा अथवा व्यवसाय देखील करतात. या बिचाऱ्या सकाळी लवकर उठून घरची सगळी कामे आवरतात, सगळ्यांसाठी जेवण बनवून