उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचं आज निधन झालं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत असताना वडिलांच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.
योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांनी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये आज अखेरचा श्वास घेतला.