भारताच्या क्रिकेट जगतात अल्पावधीतच लोकांच्या गळ्यामधील ताईत बनलेल्या काही खेळाडूंपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. आपल्या यष्टीरक्षणासोबत तडाखेबंद फलंदाजीने भल्या भल्यांची झोप उडवणाऱ्या धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास शेवटच्या टप्प्यावर आली आहे असं एकूणच वातावरण निर्माण