१ सप्टेंबरपासून केंद्र सरकारने भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार दंडाची रक्कम वाढली असून बऱ्याच वाहनचालकांना ट्राफिक पोलिसांचा जाच सहन करावा लागत आहे. त्याविरोधात आवाज उठवून दिल्ली व आजूबाजूच्या राज्यांतील जवळपास ५० वाहतूक संघटनांनी आज चक्का जाम आंदोलन पुकारले आहे.