ईशान्य दिल्लीत CAA विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यात पोलीस कर्मचारी रतन लाल मरण पावले असून दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीच्या गोकुलपुरीजवळ भजनपुरा भागात आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. त्यात कॉन्स्टेबल रतन लाल गंभीर जखमी झाले.