मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रानौतवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ही कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत अध्यक्षांनी गृह विभागाला २४ तासात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.