पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये तब्बल ११ दिवस बँका बंद राहणार आहेत असे आरबीआयने जाहीर केले आहे. गांधी जयंती, राम नवमी, दसरा, दिवाळी यासारख्या सार्वजनिक सुट्टया एकाच महिन्यात आल्याने सर्व मिळून ११ दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. या ११ दिवसांत दुसऱ्या व चौथ्या शनिवारचा तसेच रविवारचाही समावेश आहे.