काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा मानल्या जाणाऱ्या सोनिया गांधी आजकाल प्रसार माध्यमांवरही फार पाहायला मिळत नाहीत. एकेकाळी जिथे तिथे सोनिया गांधींबद्दल पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळायचं. मात्र आता तब्येत ठीक नसल्याने आपल्या कामांचा थोडा भार त्यांनी राहुल व प्रियंका यांच्यावर सोपवला आहे.